फेब्रुवारी

19 वा हप्ता फेब्रुवारी (2025) च्या पहिल्या आठवड्यात येणे अपेक्षित आहे. पण, याला अजून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मागील हप्ता (18वा हप्ता) 5 ऑक्टोबर 2024 रोजी जारी करण्यात आला होता. म्हणून 19 वा हप्ता फेब्रुवारीमध्ये येईल असे म्हटले जात आहे. यामुळे आता पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे Pm Kisan Yojana News.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना नवीन वर्षाची मोठी भेट मिळणार आहे. खरे तर या योजनेअंतर्गत आतापर्यंत 18 हफ्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत आणि 19 वा हप्ता कधी येणार? याची सर्वच शेतकऱ्यांना आतुरता आहे. देशातील शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारकडून ही योजना चालवली जाते. ही एक पूर्णपणे केंद्रीय पुरस्कृत योजना आहे. या योजनेसाठी लागणारा सर्व पैसा केंद्र सरकार देते. या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपये दिले जातात. हे पैसे शेतकऱ्यांना एकाच वेळी मिळत नाहीत.