MSRTC BUS News : एसटीतून या लोकांचा मोफत प्रवास बंद, पाहा काय झाला निर्णय
आजारी व्यक्तींचा मोफत प्रवास बंद
महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसवाहतूक विभागाच्या 2018 सालच्या परिपत्रक अनूसार एसटीतून सिकलसेल, एचआयव्ही बाधित, डायलेसिस व हिमोफेलियाग्रस्त रुग्ण आदींना विनामुल्य प्रवास सवलत देण्यात आली होती. आता या घटकांना निमआराम किंवा आराम या बस सेवेतून मोफत प्रवास करता येणार नाही. सिकलसेल, एचआयव्ही बाधित, डायलेसिस व हिमोफेलियाग्रस्त रुग्णांना एसटीच्या केवळ साध्या बसमधून विनामूल्य प्रवास करता येणार आहे. त्यामुळे या दुर्धर आजारी व्यक्तींना एसटीच्या निमआराम हिरकणी, वातानुकूलित अश्वमेध, शिवशाही, शिवनेरी, शिवाई या बसमधून सवलत बंद करण्याचे आदेश महामंडळाचे महाव्यवस्थापक ( वाहतूक ) शि.मं.जगताप यांनी दिले आहेत.