स्ट ऑफिस MIS खात्याची विशेष वैशिष्ट्ये
तुम्ही यामध्ये किमान एक हजार रुपयाच्या पटीत गुंतवणूक करू शकता. तसेच तुम्ही एका खात्यात जास्तीत जास्त ९ लाख रुपये आणि संयुक्त खात्यात १५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता.
मासिक उत्पन्न इतके असेल
तुम्ही ९ लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला दरमहा ५,५०० रुपये मिळतील. तर संयुक्त खात्यात १५ लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला ९,२५० रुपये मिळतील.
पालक अल्पवयीन किंवा दिव्यांग व्यक्तीच्या वतीने देखील खाते उघडू शकतात.
खाते एका वर्षानंतर मुदतीपूर्वी बंद केले जाऊ शकते. मात्र, त्यानंतर त्यावर २% शुल्क वजा आकारले जाईल आणि तीन वर्षांनंतर बंद केल्यावर १ टक्के शुल्क कापले जाईल.
दुप्पट नाही तर त्याहूनही अधिक परतावा, पोस्टाच्या योजनेत मिळत आहे इतके व्याज, वाचा संपूर्ण माहिती
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत कोण खाते उघडू शकते?
एकच प्रौढ
संयुक्त खाते: जास्तीत जास्त तीन प्रौढ व्यक्ती खाते उघडू शकतात.
अल्पवयीन/ दिव्यांग व्यक्तीच्या वतीने पालक
त्याच्या स्वत:च्या नावावर १० वर्षांवरील अल्पवयीन.